Posts

Showing posts from December, 2018

ओव्हरथींकिंग पासून दूर कसे रहाल?

आज-काल बहुदा सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये #overthinking चा प्रश्न गंभीर दिसतो. ओव्हरथींकिंग म्हणजे तरी काय? नेमकं काय घडत? या समस्यातून बाहेर कस यायचं? पाहुयात खाली:👇 ओव्हरथींकिंग या शब्दाचा मराठी अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर शब्दकोशात मिळत नाही?? तरी मराठी मध्ये आपण याला चिंता करणं म्हणू शकतो. आता विचार करणंच वाईट किंवा चुकीच आहे का? तर नाही! उलट विचार केल्याने प्रश्न सुटतात, उत्तर मिळतात. आणि आपणही बारकाईने पाहिल्यास आपल्याला कळेल की सगळेच विचार म्हणजे टेन्शन नसत. चिंता आणि चिंतन, विचारांचा ताण #rumination आणि आत्मपरीक्षण #introspection यामध्ये फरक आहे. चिंता करताना होत काय?🤔 👉 एखाद्या गोष्टीविषयी विचार करताना स्वतःला थांबवू न शकणे, भूतकाळात घडलेल्या किंवा आज समोर आलेल्या एखाद्या समस्येवर उत्तर शोधण्यापेक्षा आपण नकारात्मक विचार करत बसतो, त्या विचारातून बाहेर होणं अवघड वाटायला लागतं. 👉 आपल्यासोबत काही लहानशी दुःखी घटना घडल्यास आपण एकदम टोकाचं वाईट काय होऊ शकत, अस किंवा तस काही झालं तर? यासारखे नाकारत्मक करत बसतो. 👉 भूतकाळ किंवा भविष्यकाळात घडणाऱ्य...